शिवसेना प्रमुखाच्या जयंती दिनी धरणगाव येथे सामना वाचन प्रेरणा दिवस

balasaheb-thakare

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी 2021 रोजी साजरी होणारी जयंती ‘सामना’ वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी होणार आहे. मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आजच्या तरुण पिढीने शिवसेना प्रमुख पासून वाचनाची प्रेरणा घेऊ वाचन हा छंद म्हणून जोपासावा हा या उपक्रमा मागचा हेतू आहे.

कोट बाजार शिवनेरी कार्यालय धरणगाव दि 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आले आहे.धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व शिवसेनेच्या सदस्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. व 5 वी ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लास..

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या सल्लागार सौ शिल्पा सरपोतदार,प्रदेश अध्यक्ष बी जी देशमुख यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पालकमंत्री ना गुलाबरावजी पाटील,जिल्हाप्रमुख मा.गुलाबरावजी वाघ,प.स.सभापती मा.मुकुंदभाऊ नन्नवरे,जि प सदस्य गोपाल चौधरी, चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी,तालुकाप्रमुख गजानन पाटील,प्रभारी नगराध्यक्षा सौ कल्पना विलास महाजन,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,धानोरा सरपंच भगवान महाजन,शिवसेना गटनेते पप्पू भावे,माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, दिव्यांग सेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय महाजन,प्रतिभा पाटील जिल्हा प्रमुख दिव्यांग महासंघ, तालुका प्रमुख संजय पाटील,मा.नगराध्यक्षा सौ उषाताई वाघ,शिक्षण सभापती सौ सुरेखा विजय महाजन,प.स.उपसभापती सौ शारदाताई प्रेमराज पाटील उपस्थित राहणार असून सर्व सन्माननीय नगरसेवक,शिवसेनाप्रेमी,जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय कर्मचारी,पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालय सेनेचे प्रदेश उपप्रमुख पी एम पाटील सर,जिल्हाप्रमुख डॉ.प्रशांत पाटील,रावसाहेब पाटील,ता.प्रमुख रवींद्र पाटील,सुनील जावरे,अरुण(नाना) मोरे, सतिश पाटील सर,दिलीप पाटील,श्रीकांत पाटील,अरुण पाटील, किशोर पाटील,शेख अरसद,असिफ बेग अल्लाबेग,सुनील पाटील,मनोज सपकाळे, रविंद्र पाटील,पंडित सोनवणे,विश्वनाथन पाटील, समाधान पाटील,यशवंत पाटील,महेंद्र पाटील, ग्रंथालय सेना प्रसिद्धी प्रमुख योगेश पी पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here