पनवेल (प्रतिनिधी गणेश गोवारी) – सीबीडी पोलीस ठाणे हद्दीत सन २०२० मधील अज्ञात चोरट्यांकडुन घरफोडीचे गुन्हे करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पुसट दिसत असलेल्या कारचा शोध घेत सीबीड पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सीबीडी पोलिस ठाणे हद्दीत २०२० मध्ये फिर्यादी राहणार बी/१०/५, सेक्टर ३ सीबीडी नवी मुंबई यांच्या राहत्या घराचे सेफ्टी दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन आतमध्ये प्रवेश करून दि. ०४/१०/२०२० रोजी ११:०० वाजता ते दि. ०५/१०/२०२० रोजी ०८:३० वा. च्या दरम्यान घरातील एकुण ९,०२,५००/- रूपये किंमतीचे माल त्यामध्ये ३६ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १,६०,०००/- रू. रोख रक्कम घरफोडी चोरी झाली होती. सदरबाबत सीबीडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १७०/२०२० भादवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दि. ०५/१०/२०२० रोजी नोंद आहे.
त्याअनुषंगाने सीबीडी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे घरफोडी चोरी करणारे आरोपींचा सदर गुन्हयाचे तपासामध्ये प्राप्त सी.सी.टी.व्हि. फुटेज मधील आरोपींची पुसट दिसत असणाऱ्या कारच्या साहाय्याने शोध घेत होते. सीबीडी पोलीसांनी दि. ०८/०१/२०२१ रोजी सापळा रचुन सीबीडी सेक्टर ५ येथे गुरुद्वारा रोडवर आलेल्या व्हॅगनर कार नं. MH 05 DK 5452 या कारचा पाठलाग केला व त्यामधुन पळुन जाणाऱ्या आरोपी क्रमांक ०१ ते ०३ यांना गुन्हयात अटक केली. त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता वरील आरोपीतांनी सीबीडी पोलीस ठाणे येथे घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी या आरोपींनी घरफोडी चोरी करून मिळवलेले सोन्याचे दागिने खरेदी करणारा सोनार (ज्वेलर्स) आरोपी क्रमांक ४ यास सदर गुन्हयामध्ये भादवि कलम ४११ अन्वये दि. १६/०१/२०२१ रोजी अटक केली आहे. सर्व अटक आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता वरील आरोपीतांनी सीबीडी पोलीस ठाणे येथे घरफोडी चोरी केलेले खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत. १) सीबीडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १७०/२०२० भादवि कलम ४५४, ४५७, ३८०,४११, ३४ २) सीबीडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १४१ /२०२० भा.द.वि.स.क-४५४,४५७,३८०, ४११, ३४ ३) सीबीडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १५०/२०२० भा.द.वि.स.क-४५४,४५७,३८०, ४११, ३४ ४) सीबीडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १८०/२०२० भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ४११, ३४ ५) सीबीडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २००/२०२० भादवि कलम ४५७, ३८०, ४११, ३४
आरोपींकडुन वरील सर्व गुन्हयांमधील घरफोडी चोरी केलेले एकुण ८.२९,६४५/- रू. किं. चे १८८.८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सदर गुन्हयात वापरलेली व्हॅगनर कार नं. MH 05 DK 5452 तसेच घरफोडी चोरी करण्याकरीता वापरण्यात येणारे हत्यार – कटावणी, स्कु ड्रायवर, पाना, इत्यादी यशस्वीपणे हस्तगत केलेली आहे. अटक आरोपी क्र. १ याने यापुर्वी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात अशाच प्रकारे ३४ हुन अधिक घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे अभिलेखावर निष्पन्न झालेले आहे. अटक आरोपींकडुन नवी मुंबई परिसरातील अशाच प्रकारे केलेले इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. अटक आरोपी:१) अंकुश उत्तम ढगे, वय ३५ वर्षे, रा. १०/२, साईश्रध्दा चाळ, भोपरगाव, डोंबिवली पर्व, जि. ठाणे २) युसुफ नुर इस्लाम शेख, वय २५ वर्षे, रा. ख्वाजा गरीब नवाज चाळ, शांतीनगर, कळवा पुर्व ठाणे ३) महारूफ नासीर शेख, वय २२ वर्षे, रा. इंदिरानगर झोपडपट्टी कळवा ठाणे, ४) छगनसिंग केसरसिंग राजपुत, वय ३२ वर्षे, रा. सरस्वती चाळ, भोपर डोंबिवली जि. ठाणे
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उप आयुक्त परि-१ वाशी सुरेश मेंगडे, सहा. पोलीस आयुक्त, तुर्भे विभाग भरत गाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीबीडी पोलीस ठाणे अनिल पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सीबीडी पोलीस ठाणेचे अधिकारी सपोनिरीक्षक पवन पाटील, पोउपनिरी नितीन सांगळे, व पोलीस अंमलदार पोहवा/१५२३ संजय झोळ, पोना/१८१४ संदिप फड, पोशि/३२४१ पवनकुमार पाटील, पोशि/३४४० नवनाथ पाटील, पोशि/१२५२१ गजानन पाटील, पोना/२६९० प्रमोद वाघ, पोशि/३१२५ प्रमोद साबळे यांनी तपास करून यशस्वीपणे उघडकीस आणलेला आहे गुन्ह्यातील आरोपींना दि. १८/०१/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे. गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक पवन पाटील, सीबीडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.







