जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीनिमित्त तहसिलदार कार्यालयातील नायब तहसीलदार प्रथमेश मोहड यांचा हस्ते पुजन करण्यात आले आहे तर नगरपालिकेत कार्यालय अधिक्षक संजय मिसर व पंचायत समितीमध्ये पी एम पाटील सर व राजेंद्र महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून साजरी करण्यात आली.

यावेळी गुलाबराव वाघ शिवसेना जिल्हा प्रमुख जळगांव, निलेश चौधरी लोकनियुक्त नगराध्यक्ष धरणगाव, पी एम पाटील सर, राजेंद्र महाजन, विलास महाजन, उषाताई वाघ, अंजलीताई विसावे, विनय भावे, भानुदास विसावे, भागवत चौधरी, वासुदेव चौधरी, प्रेमराज पाटील बांभोरी, बुट्या पाटील, पटेल मंहकाळे हे उपस्थित होते







