इड्डूकी (केरळ) – निष्पाप जीवांशी क्रूरपणे वागत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या घटना गेल्या काही वर्षात वाढीस लागल्या आहेत. गर्भवती हत्तिणीला फटाके भरलेला अननस खाऊ घालत तिच्यासकट पोटातील पिल्लाला ठार मारल्याच्या घटनेचे पडसाद फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात उमटले होते. तसेच हत्तीच्या कानात जळते कापड टाकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच केरळच्या इडुक्कीमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
केरळच्या इडुक्की जिल्ह्यात बिबट्याला पकडण्यासाठी पाच जणांना सापळा लावला होता. त्यात 6 वर्षांचा बिबट्या अडकला. त्याला ठार मारून त्यांनी त्याचे मास खाल्ले. त्यानंतर त्याची नखे, कातडी आणि दात विकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. या प्रकरणी वनविभागाने पाच जणांना अटक केली आहे.
या पाच आरोपींना घराजवळील शेतात बिबट्याला पकडण्यासाठी 100 मीटरवर सापळा लावला होता. त्यात 6 वर्षांचा सुमारे 50 किलो वजनाच्या बिबट्या अडकला. त्यानंतर या आरोपींनी त्याला ठार मारत त्याचे मांस खाल्ले आणि त्याची नखे, दात आणि कातडी विकण्यासाठी ती वेगळी काढून ठेवली.







