मिरज येथे निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या

sucide

सांगली (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – पत्नी आणि मुलासह गळफास लावून निवृत्त पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याची घटना मिरज तालुक्यातील बेळंकी येथे आज उघडकीस आली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसले, तरी शेअर बाजारात मुलावर कर्ज झाल्याने कुटुंबाने आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे.

पोलीस हवालदार अण्णासाहेब गरसिद गव्हाणे (वय 65), पत्नी मालन (वय 50) आणि मुलगा महेश (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. अण्णासाहेब गव्हाणे यांनी कुटुंबासह आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्यापि समोर आलेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी घटनास्थळाकरून तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या स्थानिक रुग्णालयात पाठविले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here