अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र शासनाने अन्यायकारी शेतकरी विरूद्द मंजूर केलली कृषी विधेयके रद्द करण्याबाबत सकारात्मक विचार करून आंदोलक शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी सोमवार, दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राज्यभरातून हजारो कार्यकर्ते शेतकरी – कामगारांच्या मोर्चात शेतकरी कामगार पक्ष सहभागी असणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सदर मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सोमवार, दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे सकाळी 11-00 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केले आहे.
प्रमुख कार्यकर्ते आपल्या स्वतंत्र वाहनांनी येणार आहेत, परंतू ज्यांना स्वतंत्र वाहनांनी येणे शक्य होणार नाही अशा कार्यकर्त्यांची पक्षातर्फे बोटीने जाण्याची व्यवस्था केलेली आहे, तरी ज्या कार्यकर्त्यांना बोटीने यायचे आहे त्यांना जाण्या- येण्याची व्यवस्था केली आहे. कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजेपर्यंत मांडवा जेट्टीवर हजर राहणे, व संध्याकाळी 4.30 वाजता पुन्हा गेट वे ऑफ इंडिया जवळून बोट सुटणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







