इस्लामाबाद – संपूर्णपणे उद्धवस्त झालेल्या पाकिस्तानने भारताशी दोन हात करण्यासाठी तब्बल ३३ कोटी रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या बदल्यात पाकला भारताकडून अद्याप एकही रूपया मिळालेला नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, पाकमध्ये या कटकारस्थानावरून चर्चेला उधाण आलं आहे. पाकिस्तानच्या सर्वश्रेष्ठ १९२ क्रिकेट खेळाडूंच्या योग्यतेच्या आधारावर वेतनासाठी पीसीबीच्या वर्षाचे बजेट १०० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
पाकिस्तानच्या संसदीय समितीने अलीकडेच पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. याशिवाय पीसीबीने कोणत्याही अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी स्वत: कबूल केले की बीसीसीआयविरूद्ध भरपाईचा दावा पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे.
पाकिस्तानचा असा दावा आहे की, २०१४ मध्ये भारताबरोबर ६ क्रिकेट मालिकेत करार झाला होता. ज्यानंतर भारताने दोन्ही देशांमधील उद्भवलेल्या परिस्थिती लक्षात घेता ही मालिका रद्द केली. वास्तविक, त्यानंतर पाकिस्तानने दावा केला की, पीसीबीने आपल्या तयारीसाठी ४५० कोटी रुपये खर्च केले आहेत. पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या विवाद निराकरण मंच (डीआरएफ) कडे अपील केले.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा ४१६ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. कंगालीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली अर्थव्यवस्था चालविण्यासाठी १.२ अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज घेतले आहे. पाकिस्तानकडे गेल्या सहा महिन्यांपासून ५.२ अब्ज डॉलर्सची उधारी आहे. परंतु आता पुन्हा एकदा नव्याने पाकिस्तानने कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे.







