विचीत्र आजार बनला त्यांच्या लव्हस्टोरीतील व्हिलन

love-story

लंडन – ब्रिटनमध्ये एका अजब लव्ह स्टोरीची गजब कहानी समोर आली आहे. हे प्रेमी जोडपं सेक्स करू शकतात पण त्यांना लग्नाला अजीबात परवानगी नाही. या जोडप्यातील महिलेला असलेला विचीत्र आजार यांच्या लव्हस्टोरीतील व्हिलन बनला आहे.

६९ वर्षांची ही महिला केअर होममध्ये राहते. तिथंच राहणाऱ्या एका व्यक्तीवर तिचं प्रेम जडलं. तिला त्याच्याशी लग्नही करायचं होतं. पण कोर्टानं तिला त्याच्यासोबत लग्न करण्याची परवानगी नाकारली आहे. ती त्याच्यासोबत सेक्स करू शकते पण लग्न नाही, असा निर्णयच कोर्टानं दिला आहे.

या महिलेला डिमेन्शिया नावाचा आजार आहे. ज्यामध्ये व्यक्तीला विसराळूपणा येतो, त्या व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याचीही क्षमता नसते. लंडन हायकोर्टानं याबाबत आपला निकाल दिला आहे. लग्नाबाबत निर्णय घेऊ शकते इतकी या महिलेची मानसिक क्षमता नाही. पण ती सेक्शुअल रिलेशनशिपबाबत निर्णय घेऊ शकते, असं कोर्टानं म्हटल आहे.

न्यायाधीशांनी सांगितलं की, महिलेजवळ घर, आर्थिक आणि लग्नासंबंधी निर्णय घेण्याची मानसिक क्षमता नाही. घटस्फोटासारखी परिस्थिती उद्भवली तर पैसे आणि संपत्तीचं काय होऊ शकतं, याचा अंदाजाही या महिलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here