नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे आणि उद्योग श्रेत्रासाठी रजनीकांत श्रॉफ यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत
सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल, परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल, नामदेव कांबळे यांना साहित्यातील योगदानाबद्दल आणि जसवंतीबेन पोपट यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
यासोबतच कला क्षेत्रात एस. पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर ), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्व तज्ज्ञ बी. बी. लाल यांना पद्म विभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. तसंच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये १० जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. या महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे. सरकारने ७ जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे. यात पार्श्वगायक एस. पी बालसब्रमण्यम यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. तर १०२ जणांचा पद्म भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधानांचे माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा, माजी केंद्रीयमंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर) आणि धर्मगुरु कलदी सादिक (मरणोत्तर) यांच्यासह १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.







