अमृतसर-सहरसा जनसाधारण एक्सप्रेसमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याचा तरुणीवर अत्याचार

rape
file photo

नवी दिल्ली (प्रतिनिधी) । रेल्वे कर्मचाऱ्याने मदतीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी अमृतसर-सहरसा जनसाधारण एक्सप्रेसने प्रवास करत होती.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पीडित 26 वर्षीय तरुणी नवी दिल्लीहून आपल्या गावी बक्सरला जाण्यासाठी जनसाधारण एक्सप्रेस मध्ये बसली होती. छापरा मार्गे तिला सून पुरला उतरायचे होते आणि तिथून बक्सरला जाण्यासाठी तिची योजना होती. मात्र तांत्रिक कारणास्तव ट्रेन सोनपूरला न थांबल्याने ती हाजीपुरला पोहोचली. रविवारी रात्री ती पुन्हा दुसऱ्या एका ट्रेनने सोलापूर स्थानकावर आली. प्रवासादरम्यान तिचे सामान आणि तिकीट हरवल्याने ती प्रचंड घाबरली. ती मदतीसाठी कोणाची तरी वाट पाहत होती.
त्यावेळी सोनपूर स्थानकावर तिची भेट सुनील कुमार नावाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी झाली. सुनीलने तिला मदतीची आश्वासन दिले. त्यानंतर तिला आपल्या सरकारी निवासस्थानी नेले. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास आरोपीने तरुणीच्या आरोपीने संधी साधत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर तरुणी घाबरली आणि तिथून पळ काढला. तिने रस्त्यावर गस्त घालत असलेल्या पोलीस रक्षकांकडे धाव घेतली.
पोलीस रक्षकांनी पिढीतेला तातडीने पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक नीलिमा कुमारी यांनी या प्रकरणाची गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपी सुनील कुमार याला अटक केली. पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here