केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रीय मराठी संघा’कडून नवी दिल्लीत शुभेच्छा

नितीन गडकरी

नवी दिल्ली (संपादक सुनिल पाटील) | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या ६९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘राष्ट्रीय मराठी संघा’च्या पदाधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या स्नेहपूर्ण भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

​याप्रसंगी राष्ट्रीय मराठी संघाचे केंद्रीय अध्यक्ष श्री. आनंद रेखी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री. सुभाष लोखंडे, दिल्ली प्रदेश अध्यक्ष श्री. अतुल बोकरिया जैन आणि श्री. प्रितम गवारे प्रामुख्याने उपस्थित होते.​

​भेटीदरम्यान राष्ट्रीय मराठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांनी देशात घडवून आणलेली रस्ते क्रांती, पायाभूत सुविधांचा  अभूतपूर्व विकास आणि जनहिताच्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. ‘देशाला प्रगतीपथावर नेणारे खंबीर नेतृत्व’ अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली. तसेच केंद्रीय मंत्र्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here