पाकिस्तानी दहशतवादी यासिरचा जम्मू-काश्मीरमध्ये एन्काउंटर

दहशतवादी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील अशदार गली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला आणि पाकिस्तानचा नागरिक दहशतवादी ‘यासिर’ हा ठार झाला. ही कारवाई भारतीय लष्कर, जम्मू- काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ (CRPF) यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ठार झालेला यासिर हा २०२४ मध्ये झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

बडगाम जिल्ह्यातील अशदार गली परिसरातील पीर पंजाल पर्वतरांगांमधून काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली. या माहितीच्या आधारे भारतीय लष्कराच्या ‘चिनार कॉर्म्स’, काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकाने संयुक्त शोधमोहीम सुरु केली. या मोहिमेला ‘ऑपरेशन अशदार’ असे नाव दिले. सुरक्षा दलांनी जंगलाच्या चारही बाजूने वेढा घातला. हे लक्षात येताच लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. याला प्रतिउत्तर सुरक्षा दलांनी दिला आणि यात यासिरला गोळ्या घालून ठार करण्यात आले. या मोहिमेनंतर जम्मू काश्मीरपोलिसांनी ‘एक्स’ (X) वर एक पोस्ट केली त्यात “तुम्ही पळू शकता, पण लपून राहू शकत नाही!” असे लिहिले.
ठार झालेला ‘यासिर’ हा लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये झालेल्या तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यात यासिरचा सहभाग होता. ४ मे २०२४ रोजी पुंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. सुराकोट भागातील शाहसितारजवळ हवाई दलाचे जवान ‘सनाई टॉप’ येथील तळावर परतत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात हवाई दलाचा एक जवान शहीद झाला आणि इतर चार जण जखमी झाले.
दुसरा हल्ला २० ऑक्टोबर २०२४ मध्ये झाला होता. सोनमर्गजवळील गंगनगीर येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी एका स्थानिक डॉक्टरसह सात जणांची हत्या केली होती. या हल्ल्यात यासिरचा सहभाग होता.
२४ ऑक्टोबर २०२४ मध्ये तिसरा हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी गुलमर्गजवळील ‘बोटा पाथरी’ येथे लष्कराच्या एका वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन सैनिक आणि दोन नागरी कामगारांसह (पोर्टर्स) पाच जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात देखील यासिरचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here