दादासाहेब दिंगबर शंकर पाटील महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी दिला मैत्री अन् आठवणींना उजाळा

दादासाहेब दिंगबर शंकर पाटील

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | येथील दादासाहेब दिंगबर शंकर पाटील महाविद्यालयातील सन १९९३ च्या बी.ए. वर्गातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा ‘स्नेहबंधन १९९३’ हा स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साही आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे ३१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या ४८ माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भूगोल विभागाचे प्रा. एस.पी. पाटील आणि इंग्रजी विभागाचे प्रा. डी.डी. पाटील उपस्थित होते. या वेळी माजी विद्यार्थीमधून गजानन पाटील, रवींद्र पवार, वासुदेव पाटील, सुरेखा पळशीकर, शुभांगी मंत्री आणि ईश्वरी पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सर्वांनी मैत्री आणि सुंदर आठवणींना उजाळा देत भावूक भावना व्यक्त केल्या. प्रा. एस.पी. पाटील व प्रा. डी.डी. पाटील यांनी उपस्थानांना मार्गदर्शन करताना अशा स्नेहमेळाव्यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात अशा उपक्रमांमुळे माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय यांचे नाते अधिक दृढ व घट्ट होते, असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन आर.एस. पाटील यांनी तर आभार सुरेश पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here