जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ आदर्श शिक्षक सन्मानित

काँग्रेस कमिटी

जळगाव (संपादक सुनिल पाटील) |  शिक्षक दिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ आदर्श शिक्षक बांधवांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस हाजी मुक्ती हारून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अखिल भारतीय सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. सलीम पटेल, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस. एस. राणे, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक खलाणे, धनगर अण्णा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोसोदे, जिल्हा खजिनदार राहुल बाहेती, वरिष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय वाणी, एससी सेलचे अध्यक्ष कटारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानासंदर्भात व त्यांच्या कार्याचा गौरव करत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात श्रीमती रूपाली पाटील (पाचोरा), श्रीमती सुनिता पाटील (जळगाव), श्रीमती रूपाली देवरे (जळगाव), डॉ. अर्चना सूर्यवंशी (जळगाव), श्रीमती अनिता सतीश पाटील (जळगाव), प्रा. सागर सोनवणे (जळगाव), प्रसन्न रमेश खंडाळे (चाळीसगाव), भटू आव्हाळे (एरंडोल), राजेंद्र मधुकरराव देशमुख (अमळनेर), प्रमोद धर्मराज पाटील (धरणगाव), हिलाल पुंडलिक पाटील (अमळनेर), विनोद प्रकाश पाटील (चोपडा), दीपक हरी सोनार (चोपडा), प्रा. वासुदेव पाटील (जळगाव), गजानन अशोक सुरवाडे (भुसावळ), मोहसीन खान अजित खान (जळगाव), अशोक सोनू पार्टी (जळगाव), मनोहर भजनलाल तेजवानी (जळगाव), डॉ. संजय कुमार सोनवणे (धरणगाव), सुनील भिवा जाधव (पारोळा), प्रा. इक्बाल मिर्झा (जळगाव), नरेंद्र भोई (जळगाव), भिका सोमा सपकाळे (आवार ता. जळगाव), दिनेश नवल चव्हाण (एरंडोल) या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण पाटील यांनी केले, सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप सोनवणे यांनी मानले. या सोहळ्याला युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक सोनवणे, मुजीब पटेल, कौस्तुभ पाटील, जाकीर बागवान, अर्चना गाडे, छाया कोरडे, लीला सोनवणे, प्रभाकर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here