पारोळा पोलिसांची कारवाई; ईको कारच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातूंच्या पावडरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पारोळा पोलिसांची

जळगाव (प्रतिनिधी शेख जावीद) | पारोळा पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त नाकाबंदीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील म्हसवे गावा जवळ संशयास्पद वाहनाची तपासणी करताना ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातूंची पावडर चोरी करून त्याचा अवैध व्यापार करणाऱ्या टोळीचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी मारुती सुझुकी वॅगनार (क्र. DL-3-CBU-3358) अडवून तपासणी केली. वाहना मध्ये आसीफ यामीन (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगड, उत्तर प्रदेश) हे आढळून आले.वाहनातून ३ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर व ५ ते ६ किलो पावडर जप्त पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या ताब्यातून जुने वापरलेले ईको वाहनांचे तीन सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर तसेच त्यामधील अंदाजे ५ ते ६ किलो ‘सायलेंसर माती’ अथवा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर पावडर आढळून आली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्राथमिक चौकशीत संशयितांकडून मारुती सुझुकी ईको वाहनांचे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या पद्धतीने काढून त्यातील मौल्यवान घटकांची विक्री अथवा व्यापार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडिअमला मोठी किंमत कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या आतील भागात मधमाशांच्या पोळ्यासारखी Honeycomb रचना असते. त्यावर प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडिअम यांसारख्या मौल्यवान धातूंचा वापर केला जातो. या धातूंना मोठी बाजारपेठीय किंमत असल्याने जुन्या वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरची चोरी करून त्यातील घटकांचा अवैध व्यापार केला जात असल्याचे तपासातून समोर येत आहे.ईको वाहनांनाच लक्ष्य का

प्राथमिक तपासानुसार संशयितां कडून विशेषत मारुती सुझुकी ईको वाहनांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून आले आहे. वाहनाची तुलनेने अधिक ग्राउंड क्लीअरन्स असल्याने वाहनाखाली सहज जाता येणे आणि कॅटॅलिटिक कन्व्हर्टर कमी वेळेत काढता येणे, यामुळे ही वाहने चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचा संशय आहे.मुंबई, ठाणे परिसरातील चोऱ्यांचाही तपासप्राथमिक चौकशीत संशयितांनी मुंबई व ठाणे परिसरात अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणां बाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत किंवा नाहीत, याची पडताळणी सुरू आहेपारोळा पोलिसांची सतर्कता ठरली निर्णायक महामार्गावर सुरू असलेल्या नाकाबंदीमध्ये पोलिसांनी संशयास्पद वाहनाची बारकाईने तपासणी केल्याने हा वेगळ्या प्रकारचा चोरीचा प्रकार उघडकीस आला. पारोळा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त कारवाईमुळे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचे संभाव्य नेटवर्क पोलिसांच्या रडारवर आले आहे.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूसदर प्रकरणात संशयित आणि जप्त मुद्देमालाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक स्वरूपात BNS कलम 303, 317(2), 317(4), 317(5), 324(4), 324(5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 199A अन्वये कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती आहे.चोरी केलेला माल नेमका कोणाकडे विकला जात होता, या टोळीमागे आणखी कोणाचे नेटवर्क आहे आणि चोरीच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधून मिळणाऱ्या मौल्यवान धातूंची पुढे विल्हेवाट कशी लावली जात होती, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here