अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – लहान वयात सर्वाधिक विक्रम असणारी शर्विका महाराष्ट्रातील सर्वात लहान कन्या ठरली आहे. जागतिक विक्रमवीर,महाराष्ट्राची लाडकी शिवकन्या,भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद असलेली #शर्विका म्हात्रे# हिने आज ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वयाच्या साडेतीन व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर करून पुन्हा एकदा जागतिक विश्व विक्रम केला आहे…

•INDIA BOOK OF RECORDS….YOUNGEST CLIMBER
•ASIA BOOK OF RECORDS….GRANDMASTER
•INDIA BOOK OF RECORDS..HIGHEST FORT
•ASIA BOOK OF RECORDS….HIGHEST FORT
•WORLD BOOK OG RECORDS….HIGHEST FORT
•INDIA BOOK OF RECORDS…HIGHEST PEAK
•ASIA BOOK OF RECORDS….HIGHEST PEAK
•WORLD BOOK OF RECORDS….HIGHEST PEAK
•DIAMOND BOOK OF RECORDS….HIGHEST PEAK
•O.M.G. BOOK OF RECORDS…..HIGHEST PEAK
जागतिक विक्रमविर बाल गिर्यारोहक कुमारी शर्विका जितेन म्हात्रे हिने पुन्हा एक विश्वविक्रम नोंदवून महाराष्ट्राचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शर्विकाने महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर वयाच्या अवघ्या साडेतीन व्या वर्षी सव्वा तीन तासात सर करून सलग दहावा विक्रम आपल्या नावे नोंदविला आहे. शर्विका ही अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची कन्या असून तिने यापूर्वी तेवीस किल्ले सर केले आहेत नुकतीच तिची महाराष्ट्रातील सर्वात उंच सर किल्ला किल्ला सर केल्यामुळे पाच रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती आणि पुन्हा एकदा ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करून स्वतःसह महाराष्ट्राचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड,आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओ. एम.जी.बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर करणारी शार्विका ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने शर्विकाने शिखरावर पोहोचून मराठी भाषा संवर्धन आणि विकास यावर आधारित संदेश दिले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धन करणाऱ्या समस्त दुर्ग सेवकांना मानवंदना दिली आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांना आणि मराठी साहित्य विश्वाला ही मोहीम समर्पित केली आहे. शर्विकाच्या या मोहिमेत तिच्यासोबत सुमारे पस्तीस गिर्यारोहकांचा समावेश होता यामध्ये डॉक्टर्स, पोलीस, वकील, शिक्षक त्याचप्रमाणे साहित्यसंपदा संस्थेचे विविध साहित्यिक सुद्धा सहभागी झाले होते. शर्विकासोबतच्या संपूर्ण टीमकडून कळसूबाई शिखरावर ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ७२ तिरंगा ध्वज फडकविण्यात आले तसेच सहभागी साहित्यिकांकडून मराठी साहित्याशी निगडित ध्वज आणि फलक प्रदर्शित करण्यात आले.

कळसूबाई मोहिमेच्या समारोपानंतर साहित्यसंपदा या संस्थेतर्फे कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी शर्विकाची ग्रंथतुला करण्यात आली तिच्या वजनाची सर्व पुस्तके गरजू शाळांना देण्यात येणार आहे, शर्विकाच्या या विशेष मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.







