बिहारमधील हत्याकांडप्रकरणी माजी आमदार कुंती देवी यांना जन्मठेप

court

गया – बिहारमधील बहुचर्चित सुमारिक यादव हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या अतरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार कुंती देवी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एडीजी कोर्टाने हा निकाल दिला. कोर्टाने १९ जानेवारी रोजी कुंती देवी यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

कुंती देवी या निकाल सुनावला त्यावेळी कोर्टात हजर नव्हत्या. आजारी असल्याकारणाने त्यांना कोर्टात हजर राहता आले नाही. हे हत्या प्रकरण सात वर्षांपूर्वीचे आहे. या प्रकरणात कुंती देवी यांना दोषी ठरवून कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जेडीयू नेते सुमारिक यादव यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली होती. २०१३ मधील या घटनेने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले होते. या प्रकरणी सुमारिक यादव यांचे बंधू विजय यादव यांनी तक्रार दाखल केली होती. त्याआधारे नीमचक बथानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारिक यादव यांच्या हत्येचा आरोप कुंती देवी यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात १९ जानेवारीला कोर्टाने कुंती देवी यांना दोषी करार घोषित केले. त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here