ठाणे (प्रतिनिधी) – ठाण्यातील वर्तक नगर मधील कामगार कल्याण केंद्रात प्रजासत्ताक दिनी सकाळी दहा वाजता कार्यक्रम अध्यक्ष पत्रकार सुभाष जैन यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
देश स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांचे स्मरण करा आपणही देशासाठी खारुताई प्रमाणे देशासाठी काही तरी करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रप्रमुख गौतम धिवार यांनी उपस्थित मान्यवरांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. यावेळी वागळे इस्टेट केंद्र संचालक विनोद पाटील, सा.का. पत्रकार भीमराव शिरसाट, सौ पुष्पा जामगांवकर, प्रतिभा साळवे, चौधरी मॅडम उपस्थित होत्या. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता ठराविक लोकांनाच निमंत्रित करण्यात आले होते.







