ग्रामीण भागात शालेय वेळात एस टी सुरू करा – चाळीसगाव एस टी आगार व्यवस्थापकांकडे रयत सेनेची मागणी

chalisgaon-rayat-sena

चाळीसगाव (प्रतिनिधी) – कोरोना काळात चाळीसगावातील सर्व शाळा महाविद्यालय बंद होते त्याकाळात एस टी देखील सरकारने बंद केली होती मात्र कोरोना महामारीचा संसर्ग देखील कमी झाल्याने आजच्या घडीला सर्व परीस्थिती हळूहळू पुर्वपदावर आली आहे.म्हणून चाळीसगावातील सर्व शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात एस टी च्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात यासाठी दि २७ रोजी चाळीसगाव एस टी आगार व्यवस्थापकांकडे रयत सेनेच्या वतीने निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी चाळीसगाव येथे येतात मात्र आपल्या चाळीसगाव आगारा मार्फत ग्रामीण भागात अद्याप ही एस टी सुरू झाल्या नसल्यामुळे खाजगी वाहनाने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चाळीसगाव येथे येण्यास आर्थिक दृष्ट्या परवडत नाही तसेच खाजगी वाहने देखील वेळेवर नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावातून सकाळी ५ वाजता व रात्रीच्या मुक्कामी एस टी सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. आपण लवकरात लवकर ग्रामीण भागात एस टी सुरू न केल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रयत सेना आपल्या एस टी आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ उग्र आंदोलन पुकारेल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास एस टी आगार व्यवस्थापक त्यास सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचा ईशारा रयत सेनेच्या वतीने एस टी आगार व्यवस्थापकाना दि २७ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे

निवेदनाच्या प्रत आमदार चाळीसगाव, पोलीस निरीक्षक ,शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ पवार ,शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, समन्वयक रोहन पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, दिलीप पवार ,दीपक देशमुख, दत्तात्रय देठे , दत्तु पवार ,शिवाजी पवार, सागर पवार ,तसेच विद्यार्थिनी ज्योती गायकवाड, कविता पाटील ,सपना कुऱ्हाडे ,चैताली आमले अदिच्या निवेदनावर सह्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here