धनाजी नाना महाविद्यालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

dhanaji-nana-college-faizpur

यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंखे) – फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एल चौधरी, महाविद्यालयाचा सी आर पी एफ मध्ये कार्यरत कॅडेट पंकज कोळी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कॅडेट्स उपस्थित होते.

कोरोनाविषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे तंतोतंत पालन करून ध्वजारोहण सोहळा दिमाखात साजरा झाला. कार्यक्रमा च्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सण आणि उत्सव समीतीचे चेअरमन डॉ आय पी ठाकुर, एन सी सी अधिकारी लेफ्टनेंट राजेंद्र राजपूत, नितिन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, नारायण जोगी, संतोष तायड़े, कैलास चन्दनशिव, ललित पाटिल, प्रमोद अजलसोंडे, पराग राणे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here