सांगलीतील हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांची धडक कारवाई

sex-racket-file-photo
संग्रहित छायाचित्र

वेश्या अड्ड्यावर पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ

सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – शहरानजिक कर्नाळ रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल रणवीर मधील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर सांगली पोलिसांची धडक कारवाई झाली आहे. या कारवाईत एका पोलीस निरीक्षकासह सहा संशयितांना अटक करण्यात आली तर दोन तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

सांगली शहरानजिक हॉटेल रणवीरमध्ये खुले आम हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आल्याने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने रात्री उशिरा या हॉटेलवर छापा टाकून वेश्याव्यवसाय उध्वस्त केला.

विशेष म्हणजे या छाप्यात आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर यांच्या सह या हॉटेलचे मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित यांना अटक करण्यात आली आहे. तर दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. दरम्यान वेश्या अड्ड्यावर पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मायादेवी काळगावे यांनी फिर्याद दिली आहे. कर्नाळ रोडवरील हॉटेल रणवीर येथे वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here