नाशिक (विशेष प्रतिनिधी) – महावितरण मधील कर्मचारी संदीप पाचंगे हे तसे गेल्या 22 वर्षापासून आवडीच्या नाट्यक्षेत्रात कार्यरत असून यामाध्यमातून काम करत असताना हजारो पथनाट्य व अनेक एकांकिका राज्य नाट्य स्पर्धा तर कधी स्पर्धा आयोजक /समनव्यक म्हणून ही भूमिका बाजवत तर कधी वृत्तपत्रासाठी नाट्यलेखन कुठं नाट्यपरीक्षक तर कधी शाळा महाविद्यालयात नाट्य प्रशिक्षक म्हणून ही आवड वेगवेगळ्या माध्यमातून जामनेर जळगाव ते धुळे आणि आता नाशिक शहरातून जपत आहे.

2010 ला महावितरणला रुजू झाल्यापासून आत्यावश्यक सेवेत रुजू झाल्यामूळ ही घौडदौड थांबेल आणि नाटकाला पूर्णविराम मिळेल असं वाटत होते ,मात्र नाटक ही अशी कला आहे जी एकदा अंगात भिनली की शेवटच्या श्वासापर्यंत ती शरिरात तरतरीत राहते किंबहुना ती शांत बसू देत नाही.

नेमकं तेच नोकरी नंतर ही झालं आणि महावितरण यंत्रचालक ही जोखमीची तांत्रिक जबाबदारी अतिशय सुयोग्य रितीने सांभाळत उपकेंद्रातील सर्व तांत्रिक अडीअडचणीवर नेहमी आपल्या तांत्रिक कुशलतेने मात करत सुरळीत वीजपुरवठा कसा राहील ही काळजी व जबाबदारी आपल्या कर्तव्य काळात यशस्वीपणे पार पाडत वरिष्ठांची नेहमीच कौतुकाची थाप मिळवली तर उरल्या वेळेत आपल्या आवडीच्या नाट्यकलेतून महावितरणची सेवा करत त्यातून मग महावितरण नाट्यस्पर्धा,महावितरण सुरक्षापर ठीकठिकाणी पथनाट्ये,एकपात्री प्रयोग, अश्या विविध माध्यमातून महावीरण मध्ये रुजू झाल्यापासून सुरक्षा,वसूली,वीजअपघात,किंवा महावितरणच्या वेवेगळ्या योजना यांची विजग्राहक व विजकर्मचारी यांच्या सानिध्यात जाऊन स्वयंप्रेरणेने सातत्याने प्रबोधन व जनजागृती करत आहेत.

अर्थात नाटक व नोकरी यांची सुयोग्य सांगड घालत महावितरण आस्थापनेला सदर कार्याबद्दल दखल घ्यावीशी वाटली व तसा प्रस्ताव त्यांनी कामगार कल्याण मंडळाकडे २०१७ ला पाठवला व कामगार कल्याण मंडळानेही महाराष्ट्रातील अश्या 200 हुन अधिक आलेल्या विविध कंपनी क्षेत्रातील कामगारांच्या प्रस्तावाचे मुलाखत व विविध स्तरातून परीक्षण करून एकूण विविध क्षेत्रातील 53 कामगारांची २०१७/१८ साठी निवड केली आहे.

सद्यस्थितीत महावितरण नाशिक येथे वरिष्ठ यंत्रचालक म्हणून नाशिक ग्रामीण विभाग मध्ये सिन्नर उपविभाग येथे 33/11 केव्ही ठाणगाव उपकेंद्र येथे कार्यरत असलेले रंगकर्मी संदीप रघुनाथ पाचंगे ज्यांचे मूळ गाव सोनाळा ता.जामनेर जी.जळगाव येथिल असून दगडूशेठ यांचे ते नातू तर रघुनाथजी यांचे तृतीय सुपुत्र ज्यांचे दोन्ही बंधू सुरेशजी व दिपकजी हे सुद्धा महावीरण मध्ये कार्यरत आहेत अश्या या ध्येयवेड्या नाट्य कलावंताने आपल्या दगडू आजोबांच्या गोंधळी लोककलेतुन वारसा घेत नाट्यकलेतून नवरूपास येत याच क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगीरी केल्यानिमित्त त्यांना येत्या 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता या भव्य पारितोषिक वितरण सोहळ्यात कामगार कल्याण भवन मध्यवर्ती कार्यालय ,मुंबई येथे गुणवंत कामगार म्हणून राज्य शासनाच्या वतीने गौरवण्यात येणार आहे.







