महिलेचे सिजेरियन करण्यासाठी लाच घेताना वैद्यकीय अधीक्षकाला अटक

solapur-doctor

सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष आडगळे यांना प्रस्तुतीसाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

solapur-LCB

तक्रारदाराने कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात पत्नीला प्रस्तुतीसाठी दाखल केले होते. त्या रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ तथा अधीक्षक डॉक्टर संतोष आडगळे यांनी तक्रारदाराकडे सिजरिंग करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तडजोड करून नऊ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर पतीने याबाबतची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला दिली. विभागाने सापळा रचून डॉक्टर संतोष आडगळे यांना लाच घेतना रंगेहात पकडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here