अपघातात दुचाकी पेटल्याने दोघांचा होरपळून मृत्यू

accident-in-amravati

अमरावती – अमरावती-परतवाडा मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा भाजल्याने मृत्यू झाला. ही हृदय हेलावून टाकणारी घटना आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आसेगाव पूर्णा येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. निवृत्ती दीपक सोलव आणि राज अनंत वैद्य अशी मृतांची नावे आहेत.

निवृत्ती सोलव व राज वैद्य हे अचलपूर तालुक्यातील तळणी पूर्णा येथून दुचाकीने आसेगावकडे निघाले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप (एमएच २७/ बीएक्स ३८१२) वाहनाची त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यामध्ये निवृत्ती सोलव याचा भाजल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राज वैद्य त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणत असताना वाटेतच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच आसेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बोलेरो वाहन चालक निंभारी येथील असल्याची माहिती पुढे आली असून, घटनेचा पुढील तपास आसेगाव पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here