कंपनीने ऑफर केलीय घरी बसून टॉफी खाण्याची नोकरी; महिन्याला मिळेल ८ लाख रुपये पगार

candy-funhouse

कॅनडा – तुम्हांला जर टॉफी खाण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. एका कंपनीने अशी नोकरी ऑफर केली आहे की, तुम्हांला फक्त बसून टॉफी खायची आहे आणि त्यासाठी तुम्हांला भरभक्कम पगार मिळेल. आता तुम्ही विचार कराल की एक चांगली कंपनी टॉफी खाण्यासाठी कशाला भरभक्कम पगार देईल? तर ही बातमी अगदी खरी आहे.

कॅडी फनहाऊस ही कॅनेडीयन टॉफी कंपनी आहे. ज्या व्यक्तीला टॉफीची चांगल्याप्रकारे माहिती असेल अशा कर्मचाऱ्याचा ही कंपनी शोध घेत आहे आणि यासाठी भरघोस पगारही देणार आहे. यातील सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, जगाच्या पाठीवर कुठेही राहून तुम्ही हे काम करु शकता.

ही कंपनी कॅनडाच्या ओंटारियो राज्यातील सिनिसागा शहरात आहे. कंपनीला पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशा कॅडिओलॉजिस्टची आवश्यकता आहे. हा कॅडिओलॉजिस्ट कंपनीने बनविलेल्या टॉफीच्या चवीबद्दल जगाला सांगेल. कंपनीने या जाहिरातीत म्हटले आहे की, या कामासाठी ते प्रतितास ४७ कॅनेडियन डॉलर मोजण्यास तयार आहे.
या जाहिरातीनुसार कंपनी तुम्हांला ८ तासाच्या कामासाठी दररोज ३७६ डॉलर म्हणजे २७ हजार ४४७ रुपये देईल. अशा प्रकारे ही कंपनी एका महिन्याला तब्बल ८ लाख २३ हजार ४१० रुपये पगार देईल. म्हणजे एका वर्षाच्या पॅकेजचा विचार केला तर त्या कर्मचाऱ्यास ९८ लाख ८० हजार ९२० रुपये पगार मिळेल आणि हे काम तुमच्या घरात बसून करण्यासाठी कॅडी फनहाऊसची परवानगी असेल.

ही नोकरी जर मिळाली तर आपल्याला त्यांच्या टॉफी उत्पादनाची चाचणी करावी लागेल आणि या टॉफीमध्ये काय चांगले आहे वा काय वाईट आहे हे सांगावे लागेल. त्यात कोणत्या प्रकारचे फ्लेवर वापरता येतील ते ही सांगायचे आहे. या कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर या नोकरीबद्दल जाहिरात केली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. तुम्हांला जर टॉफी खाण्याची आवड असेल तर उशीर करु नका, लवकरात लवकर या https://candyfunhouse.ca/pages/careers वेबसाईट जाऊन या नोकरीसाठी अर्ज करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here