कात्रजमध्ये दुचाकीस्वार व्यावसायिकाला लुटले

theft-businessman

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – दुचाकीवरून घरी चाललेल्या व्यावसायिकाला अडवून लुटल्याची घटना आज पहाटे कात्रज भागात घडली. याप्रकरणी तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपिल बाफना (वय 36,रा. कोंढवा बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काल रात्री बाफना मित्राबरोबर जेवायला गेले होते. रात्री ते मित्राबरोबर गप्पा मारत थांबले होते. पहाटे चारच्या सुमारास दुचाकीस्वार बाफना कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाले होते.

राजस सोसायटी चौकापासून काही अंतरावर बाफना थांबले. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी बाफना यांना धमकावले. त्यांच्याकडील रोकड, बँकेची कागदपत्रे असा 5 हजार रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here