घटस्फोटित,परित्यक्ता आणि अपत्यहीन महिलांसाठी रविवारी विशेष हळदी कुंकू समारंभ

sahara-production-house-pune

पुणे (कार्यकारी संपादक निलेश बटाणे) – सहारा प्रॉडक्शन हाऊस आणि अक्षदा विवाह संस्था यांच्यातर्फे विधवा घटस्फोटित, परित्यक्ता ,अपत्यहीन महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.हा समारंभ रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता धायरी येथे होणार आहे.अक्षदा विवाह संस्थेचे संचालक डॉ राजेंद्र भवाळकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था ही डॉ.पी.के.भवाळकर यांनी 1945 साली स्थापन केली कुमारिकांचे विवाह जमवण्या बरोबरच विधवा ,विधुर घटस्फोटितांचे ,दिव्यांग वधु वरांचे इतकेच नव्हे तर जेष्ठ नागरिकांचे विवाह जुळवण्याचे काम सामाजिक हेतूने सातत्याने चालु आहे.आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन पण दिले जात आहे. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि अपत्यहीन महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभ समाजभान ठेवून आयोजित करण्यात आला आहे,असे डॉ राजेंद्र भवाळकर यांनी सांगितले.नाव नोंदणीसाठी ८०८७२०३१३१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनजागृतीसाठी संस्थेतर्फे ‘हळदी कुंकवाचा मान सवाष्ण महिलांनाच का ?’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ६३ जणांनी सहभाग घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here