मलायकाचा हॉट अवतार पाहून चाहतेही थक्क झाले

malayaka-arrora

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – मलायका अरोराने सोशल अकाऊंटवर स्वत:चे काही हॉट फोटो शेअर केले होते आणि या हॉट फोटोंनी इंटरनेटवर नुसता धुमाकूळ घातला होता. होय, ओव्हर साईज पांढ-या शर्टमधील तिच्या फोटोंवर चाहते अक्षरश: फिदा झाले होते. पण आता चाहते अक्षरश: खल्लास झाले आहेत. होय, मलायकाने असे काही फोटो शेअर केलेत की, तिचा हॉट अवतार पाहून चाहतेही थक्क झाले. मलायकाचा आत्तापर्यंतचा सर्वात हॉट फोटो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. डिझाईनर अर्पिता मेहताच्या ‘द मिरर’ या कॉफी टेबल बुकसाठी मलायकाने हे बोल्ड फोटोशूट केले आहे.

या फोटोत मलायका मोरपंखी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसतेय. हे फोटो पाहताच चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. मलायकाच्या या फोटोंना केवळ 3 तासांत साडे तीन लाख लाईक्स मिळाले आहेत. आत्तापर्यंतचा सर्वात हॉट फोटो, कडक, स्टनिंग अशा अनेक कमेंट चाहते करत आहेत.

काही तासांआधी मलायकाने व्हाईट शर्टमधील स्टनिंग फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटोही क्षणात व्हायरल झाले होते. मलायका अरोरा नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला गेली होती. तेव्हाही तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर असेच व्हायरल झाले होते. बिकनीतील तिच्या हॉट फोटोंना चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here