टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटक्या जमातींना करावी लागते तारेवरची कसरत

dombari

कन्नड (प्रतिनिधी प्रमोद सोनवणे) – कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या आजाराने पछाडलेल्या महाराष्ट्रात गत वर्षांमध्ये कोरोना मुळे सर्वच व्यावसायिकदार तथा नागरिकांना आर्थिक परिस्थितीची टंचाई तथा जीवन आवश्यक वस्तूंची कमतरता है अचानक स्वाभाविक पणे ओढवलेले संकट सर्वांच्या पदरी आले या संकटाचा सामना करण्यासाठी पुढे सरसावलेल्या हातांना देखील कोणतेच काम मिळत नव्हते. त्यामुळे भटकी जमात दिसेनासी अदृश्य होत चालली होती.

हळूहळू कोरोना नावाच्या महाभयंकर राक्षसाचा उद्रेक आटोक्यात येत असल्याचे पाहून व्यावसायिकदार , ग्रामस्थ,नागरिक सुरक्षित रित्या रस्त्यावर आपल्या पारंपरिक व्यवसायाची गती वाढवितांना दिसू लागले आहेत यात प्रामुख्याने फेरीवाले, भाजी पाला विक्रेते छोटे मोठे दुकानदार यांचे उद्योग तथा सर्वच व्यवसाय हळूहळू सुरळीत सुरु झाल्याने अदृश्य होत चालेली भटकी जमात देखील गावोगावी रस्त्यावर उतरून टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी दोरीवर चालण्याचे पारंपरिक खेळ करतांना दिसत आहे.

आपल्या कसरतीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे हा समाज सद्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे तारेवरची कसरत करतांना दिसून येत आहे. हातावरील पोट भरण्यासाठी हा डोंबारी समाज दोरीवरील कसरत करून मिळेल त्या पैशात कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.यात कोणी दहा पाच रुपये तर कोणी वीस तीस रुपये करून देऊ करतात. त्यामुळे हा खेळ बघण्यासाठी चिमुकल्यासह थोरा मोठ्यांनी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here