लोणी काळभोरमध्ये २५ लाखांचा गुटखा जप्त

arrest

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लोणीकाळभोर येथे पुणे-सोलापूर महामार्गावर एका जीपमधून २५ लाखांचा गुटखा मंगळवारी रात्री जप्त केला. याप्रकरणी एका सराईत तस्करासह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुटखा, चारचारी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली टीमने ही कारवाई केली. पोलिसांचे पथक गस्त घालत असताना लोणीकाळभोर गावाच्या हददीत राजेंद्र पेट्रोल पंपासमोर अंबरनाथ फर्निचर दुकानासमोर सुरेश मिलापचंद ओसवाल (वय-४४ रा. चितामणी पार्श्वनाथ बिल्डिंग, महात्मा फुले नगर, माळी मळा, लोणी काळभोर), अविनाश भारत जाधव (वय-२५, रा. नायगांव ता. हवेली ) या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणातील ओसवाल हा गुटखा तस्करीतील सराईत असून त्यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, राजू पुणेकर पोलिस हवालदार मुकुंद अयाचित, पोलीस नाईक सागर चंद्रशेखर, पोलीस काॅन्स्टेबल बाळासाहेब खडके यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here