दारू न दिल्याने तरुणाचा भोसकून खून

murder-at-kolhapur

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – दारूची कॉटर देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या मित्राने धारदार हत्याराने वार करून शिरोली माळवाडी येथील तरुणाचा खून केला. अमित नाईक (वय २५ रा. महाडिक कॉलनी शिरोली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरा दोन संशयित तरुणांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमित नाईक व त्याचे साथीदार सायंकाळी शिरोली येथील मोकळ्या जागेवर दारू पीत बसले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका साथीदाराने नाईक याच्याकडे कॉटरची मागणी केली. ती देण्यास नकार देऊन नाईक याने शिवीगाळ केली. यावर त्याचा साथीदार भडकला आणि त्याने थेट धारदार शस्त्राने अमितच्या पोटावर वार केला. अमितच्या पोटावर वर्मी हल्ला झाल्याने अमित जाग्यावरच कोसळला. अति रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरोली माळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here