जूनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा वर्धातर्फे जलसंपदा मंत्री जयंतदादा पाटील यांना निवेदन

vardha-teacher

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – बुधवार दि. 3 फेब्रुवारी 2021 ला शिव वैभव मंगल कार्यालय वर्धा येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतदादा पाटील एका कार्यक्रमासाठी शिव वैभव मंगल कार्यालय वर्धा येथे आले असता त्यांना जूनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा वर्धाचेवतीने वर्धा जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे , जिल्हा सचिव प्रमोद खोडे यांचे मार्गदर्शनात व तालुकाध्यक्ष मंगेश भोमले व राजेश कापसे यांचे नेतृत्वात 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी जयंतदादा पाटील यांनी लवकरच याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी जूनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा वर्धाचे जिल्हा/ तालुका/ शहर पदाधिकारी/ कार्यकर्ते/ सदस्य व सर्व पेन्शन फायटर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here