मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – गो कोरोना गो कोरोनाचा नारा देणार्या मंत्री रामदास आठवले यांचा आंतरराष्ट्रीय संस्थेने सन्मान केला आहे. कोरोना काळात समाज कार्य केल्याबद्दल आठवले यांचा सन्मान करण्यात आला आहे. आठवले यांनी गो कोरोना गो असा नारा दिला होता. नंतर जेव्हा कोरोना लसीकरणादरम्यान नो कोरोना असा नारा दिला होता.
कोरोना काळात समाज कार्य केल्याबद्दल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सन्मान केला आहे. दिल्लीच्या निवासस्थानी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. आठवले यांनी देशवासियांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच जगातून आता कोरोना हद्दपार झाला पाहिजे. हिंदुस्थानची लोकसंख्या जास्त असूनही आपल्याकडे कोरोनाच्या रुग्ण कमी होते. देशातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी कोरोना विरोधात लढा दिला. डॉक्टरांनी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांचे जीव वाचवला असेही आठवले म्हणाले.







