पतीने स्वयंपाकावरून टोमणे मारल्याने पत्नीची फिनाईल पिवून आत्महत्या

sucide-by-finyil-drinking

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – स्वयंपाक नीट येत नसल्याचा आरोप करीत पतीकडून सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने फिनाईल पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोथरूडमध्ये घडली आहे. भाविका विलास झोरे (वय ३४, रा. कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेची आई शांती पिंगळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विलास झोरे याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाविका आणि विलास यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना तीन मूले असून ते कुटूंबींयासह कोथरूड परिसरातील रामबाग कॉलनी राहतात. गेल्या अनेक महिन्यांपासून पती विलास झोरे हे भाविका यांना काम नीट येत नाही, स्वयंपाक येत नाही असे टोमणे मारून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. या त्रासाला कंटाळून भाविका यांनी फिनेल पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here