मदतीच्या बदल्यात मित्राने लैंगिक शोषण केल्याचा राखी सावंतचा आरोप

rakhi-sawant

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – ‘बिग बॉस 14’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली राखी सावंत वाट्टेल ते बोलत असते. बेताल विधानांमुळे राखी सावंत ही इतर स्पर्धकांपेक्षा जास्त एंटरटेनिंग ठरायला लागली आहे. या शोमुळे राखी सावंत प्रसिद्ध होत चाललीय असून राखी सावंतमुळे शोमध्ये रंगत निर्माण झाली आहे. ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखीने वादग्रस्त वक्तव्ये चर्चेत कसे राहायचे हे बरोबर ओळखले आहे. बेताल विधाने करणाऱ्या राखीने तिच्यासोबत झालेला एक प्रकार सांगून खळबळ उडवून दिली आहे.

बिगबॉसच्या घरात राखी आणि राहुल वैद्य हे गप्पा मारत होते. यावेळी तिने राहुलला तिच्या आय़ुष्यात घडलेला एक भयंकर प्रकार सांगितला. तिने राहुलला सांगितले की तिची आई काही वर्षांपूर्वी आजारी होती आणि तिच्यावर उपचारासाठी तिला आर्थिक मदतीची तातडीने गरज होती. राखीने पैशांसाठी तिच्या एका मित्राकडे मदत मागितली होती. त्याने तातडीने राखीला पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा राखी त्याला भेटायला गेली तेव्हा त्याने राखीला गाडीत बसवलं आणि गाडीचे दरवाजे बंद करून घेतले. बंद गाडीत त्याने आपल्याला जगात काहीच फुकट मिळत नाही असं म्हणत पैशांच्या बदल्यात तू मला काय देणार असा प्रश्न विचारला असं राखीने म्हटलंय. माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये असं राखीने सांगितल्यावर त्याने माझ्यावर बळजबरी केली असं राखीने म्हटलं आहे.

राखीने आपले लग्न झाल्याचा दावा केला असून नवऱ्याने आपल्याला फसवल्याचा आरोपही केला आहे. रितेश असं नवऱ्याचं नाव असून जेव्हा त्याच्याशी लग्न झालं तेव्हा तो विवाहीत होता आणि त्याला मुलंही होती असा आरोप राखी सावंतने आधीच केला होता. राखी सावंतच्या सांगण्यानुसार तिचा नवरा म्हणजेच रितेश हा एक व्यावसायिक आहे. रितेश हा आपल्याला घटस्फोटाची धमकी देत असल्याचं राखीचं म्हणणं आहे. मला एकटं राहायचं नसून मी लग्न तुटू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं तिने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here