‘द फॅमेली मॅन 2’ ची प्रेक्षकांना अजून पहावी लागणार वाट

family-man-2

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अलीकडे वेब सीरिजने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. काही वेब सिरीज तर अशा आहेत कि, त्यांच्या पुढील भागाची वाट प्रेक्षक आतुरतेने बघत असतात. यातील एक गाजलेली वेब सिरीज आहे ‘ द फॅमेली मॅन’. या मध्ये अभिनेता मनोज वाजपेयींनी तुफान काम केलेलं आहे. या सीरिजचा पहिला भाग गाजल्यामुळे त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

अलिकडेच ‘द फॅमेली मॅन 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीरदेखील करण्यात आली होती. मात्र, आता या सीरिजसाठी आणखी काही काळ प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. कारण, या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दिग्दर्शक राज आणि डीके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.राज आणि डीके यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ‘द फॅमेली मॅन 2’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

“आम्हाला ठावूक आहे तुम्ही ‘द फॅमेली मॅन’च्या नव्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहात. त्यामुळे आमच्यावर इतकं प्रेम केल्यामुळे मनापासून धन्यवाद. पण तुम्हाला काही अपडेट्स द्यायचे आहेत. ‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज उन्हाळ्याच्या सुट्टीत ऍमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. एक चांगली कलाकृती तुमच्यासमोर सादर करता यावी यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे तुम्हाला ती नक्की आवडेल”, अशी पोस्ट दिग्दर्शकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here