हरदोई (उत्तर प्रदेश) – एका महिलेच्या तीन पुरुषांशी असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या नवऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हरदोई येथे घडली.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हरदोई जिल्ह्यातील बिलग्राम इथली ही घटना आहे. हत्या झालेल्या व्यक्तिचं नाव रामअवतार कश्यप आहे. त्याचा विवाह चमेली या महिलेशी झाला होता. 31 जानेवारी रोजी रामअवतार घराबाहेर झोपलेला असताना त्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी चमेलीने ऋषिपाल यादव, मन्नू आणि सोनेलाल या तिघांवर हत्येचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक सत्य उघड झालं.
चमेली हिचे ऋषिपाल यादव, विजयपाल आणि रामसेवक अशा तिघांसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या वर्षीपासून चमेली ऋषिपाल सोबत राहत होती. 20 दिवसांपूर्वी चमेली रामअवतारकडे परत आली होती. त्यानंतर ऋषिपाल हा तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन जायला आला. त्यामुळे रामअवतार आणि त्याचं भांडण झालं.
रामअवतारने यापूर्वीही तिच्या अनैतिक संबंधांना विरोध केला होता. अखेर नवऱ्याचा कायमचा काटा काढून टाकण्यासाठी चमेलीनेच त्याच्या हत्येचा कट रचला आणि कुऱ्हाडीने त्याची हत्या केली. या प्रकरणी चमेली, ऋषिपाल यादव, विजयपाल आणि रामसेवक या चौघांना अटक करण्यात आली आहे.







