मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. नैना बाबर असे मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी सूरज बाबरला बोरिवली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नैना ही आदिवासी निवास शिंपोली येथे पती आणि मुलीसोबत राहत होती. शनिवारी दुपारी नैना आणि सूरजमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सूरजने नैनाचा रुमालाने गळा आवळला. ती बेशुद्ध पडल्यावर तिला उपचारासाठी सूरजने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून नैनाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच बोरिवली पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी सूरजविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.







