“कोविड योद्ध्यांच्या” सन्मानाने उत्साह वाढला

covid-yodhya-sanman-at-barshi

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – आझाद गणेश मंडळातर्फे बार्शीतील “कोविड योद्ध्यांचा” सन्मान सोहळा काल करण्यात आला. कोरोना काळात कुठलाही उपक्रम राबवता न आल्यानं ज्यांनी या भीषण काळात उपक्रम राबवले त्यांचा सन्मान करुन आम्ही आमचं कर्तव्य बजवालंय. कालचा सोहळा अतिशय सुंदर, सुरेख आणि आमचा उत्साह वाढवणारा ठरला. आमचे नेते आदरणीय #सोपल_साहेबांनीही कौतुकाची थाप दिली.

covid-sanman

covid-satkarडोक्यात संकल्पना आल्यानंतर, केवळ 2 दिवसांत प्रत्यक्षात उतरविली. अतिशय कमी वेळेत चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही केला, आशा करतो सर्वांना आवडला असेल.

solapur-news

नागेश आण्णांनी नेहमीच्या अभ्यासू शैलीत आपलं भाषण केलं, तर भाऊसाहेबांनी पशु-प्रदर्शन च्या फडावर राहिलेली कसर आझाद चौकात काढली, त्यांच्या भाषणानं टाळ्या अन् शिट्या घेतल्याच. तर, साहेबांनीही कोविड योद्ध्यांच्या कामाचं कौतुक केल, त्यानंतर नेहमीप्रमाणे विनोदी शैलीत फटकेबाजी केली.

barshi-solapur-news

सन्मान स्विकारणाऱ्या कोविडयोद्ध्यांनीही उत्साह दाखवून पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या कार्यक्रमाने आमच्या मंडळाचा उत्साह आणखी वाढला असून यापुढेही समाजपयोगी कार्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू एवढंच यानिमित्तानं आवर्जून सांगावसं वाटतंय.पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात प्रास्तिवकवर छोटेखानी भाषण केलं , कदाचित चांगलं झालं असावं…धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here