कंपनीच्या सहायक व्यवस्थापकास कामगारांकडून मारहाण; वढू बुद्रुकच्या झेड एफ कंपनीतील घटना

hanamari

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील झेड एफ कंपनीतील कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहायक व्यवस्थापकास मारहाण केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भगवान जालिंदर लोखंडे (रा. मरकळ, ता. खेड), काळुराम भालचंद्र डेरे (रा. मित्रमंडळ सोसायटी गणेशनगर वडगाव शेरी), रामदास सुदाम गाडेकर, संजय सुदाम गाडेकर, मारुती बबन पांडे (रा. वढु बुद्रुक), रावसाहेब पांडुरंग कचरे (रा. खराडी चंदननगर), आनंदा रघुनाथ खुळे (रा. फुलगाव, ता. हवेली), प्रल्हाद हरिश्‍चंद्र परदेशी (रा. फुलेनगर, आळंदीरोड, येरवडा), दौलत श्रीपती भोसले (रा. चऱ्होली फाटा, भोसलेवस्ती, ता. हवेली), हिरामण नानाजी वेडदेवार (रा. पठारेवस्ती, चंदननगर), सुरेश आत्माराम पवार (रा. फडतरेवस्ती, कोरेगाव भीमा), संजय रामभाऊ जिद्देवार (रा. पेरणेफाटा, ता. हवेली), संजय काळूराम मोरे (रा. आव्हाळवाडी, वाघोली) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत राहुल विश्वनाथ तायडे (वय 42, रा. दत्तनगर, दिघी) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वढू बुद्रुक येथील झेड एफ कंपनीतील कामगारांच्या संघटनेची गेली अडीच वर्षांपासून कंपनी व्यवस्थापकाबरोबर चर्चा सुरु आहे. वेतनवाढीच्या प्रकरणाची कामगार आयुक्त कार्यालयात सुनावणी सुरु आहे. 10 फेब्रुवारी रोजी कंपनीचे व्यवस्थापक अभिजित मारटकर हे या प्रकरणासाठी कामगार आयुक्त कार्यालयात गेलेले होते; मात्र या प्रश्नाबाबत मार्ग निघाला नाही.

त्यामुळे संघटनेच्या पदाधिकारी आणि कामगारांनी कंपनीमध्ये मिटिंग घेतली. यावेळी कंपनीतील एच आर विभागाचे सहायक व्यवस्थापक राहुल तायडे, महेश साबळे, निशाद सलाम, नितीन जोंधळे, सुरक्षारक्षक खडकप्रसाद जैसी यांसह कंपनीचे इंजिनिअर कंपनीच्या कॅंटीनमध्ये होते.

यावेळी कंपनीच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिटिंगमधून मध्येच उठून कॅंटीनच्या आतमध्ये येऊन राहुल तायडे व सुरक्षारक्षक खडकप्रसाद जैसी यांना तुम्ही ट्रेनी इंजिनिअर यांना कॅंटीनमध्ये का बसवले, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत धमकी दिली.

कॅंटीनमधील खुर्च्या फेकून मारून बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या युवकांनी जीवे मारण्याची देखील धमकी दिली.यात राहुल तायडे हे जखमी झाले आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here