दिव्यांग,निराधार,विधवांना न्याय मिळवून देणार – पी एम पाटील सर

world-vision-india-dharangaon

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथील वर्ल्ड व्हीजन इंडिया संस्थेतर्फे दिव्यांग,निराधार व विधवा महिलांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र दिव्यांग महासंघाचे अध्यक्ष पी एम पाटील सर यांनी सांगितले केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्यांची माहिती अनेकांना नसते त्यामुळे योजना पासून हे सर्व वंचित राहतात त्यामुळे धरणगाव तालुक्या सह महाराष्ट्रातील दिव्यांग,निराधार व विधवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.
वर्ल्ड व्हिजन संस्था भारतासह एकूण 134 देशात कार्यरत असून अशा सर्व लोकांना मदत करण्याचे कार्य हे करीत असतो धरणगाव तालुक्यात 30 गावापासून सुरुवात झाली असून कोरोना काळात मास्क,अन्य धान्याचे,किड्स,सॅनिटायझर दिव्यांगांना साहित्य वाटप निराधारांना,शेळयाचे वाटप शेतकऱ्यांसाठी विविध शेती विषयक अवजारे वाटप असे अनेक उपक्रम एक ते दिड वर्षांपासून वर्ल्ड व्हीजन इंडिया संस्था ही करीत आहे.

धरणगाव येथील एका कार्यक्रमात पी एम पाटील सर यांनी विविध योजना विषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी दिव्यांग महासंघाचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन,प्रकल्प अधिकारी अनील परथ्योरकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभा पाटील, तालुकाप्रमुख संजय पाटील, रतिलाल वळवी,विजय पवार,ज्ञानेश्वर शिरसाठ,प्रकाश पाटील, आरती पाटील, वैशाली पाटील,अश्विनी पान पाटील,अश्विनी रॉबट पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

धरणगाव तालुक्यातील व शहरातील शेकडो दिव्यांग व विधवा महिला,निराधार उपस्थित होते.धरणगाव तालुक्यात 7000 दिव्यांग असून लवकरच संपूर्ण तालुक्यातील दिव्यांग व निराधार,विधवांच्या मोठ्या प्रमाणात मेळावा घेण्यात येणार असून त्यांना आवश्यक ते साहित्य मोफतचे पुरवण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी अनील परथ्योरकर व पी एम पाटील सर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here