शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

k-c-padavi

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी गेलेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील महिला कार्यकर्त्या स्व.सीताबाई रामदास तडवी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

सीताबाई यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.त्यांच्यासमवेत , माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, तहसीलदार गिरीश वखारे, राजेश अमृतकर, जि.प.सदस्य प्रताप वसावे, सी. के.पाडवी ,सुहास नाईक ,सरपंच चंदूभाई तडवी, लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या स्मिता देशमुख, संजय महाजन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here