जगप्रसिद्ध ताजमहालजवळ सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांची कारवाई

sex-racket

आग्रा (उत्तर प्रदेश) – येथील ताजमहाल हा जगप्रसिद्ध वास्तू आहे. ताजमहालचा परिसर हा अतिसुरक्षित परिसर म्हणून ओळखला जातो. अशा या अतिसुरक्षित परिसरात एक मोठं सेक्स रॅकेट आतापर्यंत बिनधास्तपणे सुरू होतं. एका रिसॉर्टमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये परदेशी तरुणीही देहविक्रय करत असल्याचं कळालं आहे. या तरुणींची पोलिसांनी सुटका केली असून दलाल भीमा याच्यासह सहा जणांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील ताजमहाल येथील शिल्पग्राम रस्त्यावरील अतिसुरक्षित भागामध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती0 पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माहितीच्या आधारे ‘शुभ रिसॉर्ट’ वर धाड टाकली. या धाडीत पोलिसांना हवा असलेला कुख्यात दलाल भीमा हा हाती लागला आहे. या धाडीत दोन परदेशी युवतींची सुटका करण्यात आली आहे. अतिसुरक्षित भाग मानल्या जाणाऱ्या या परिसरात सेक्स रॅकेट कसं सुरू होतं, याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय.

दलाल भीमा हा अत्यंत कुख्यात असून तो मुली-महिलांची तस्करी करत होता. त्याच्याकडे अंमली पदार्थही असायचे. जानेवारी 2020मध्ये त्याला चरससह पोलिसांनी पकडले होते. यावेळी पोलिसांना त्याच्या मोबाईलमधून शहरातील अनेक दलालांचे नंबर मिळाले होते. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे काही दलालांना अटकही करण्यात आली होती. भीमाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी देहव्यापार चालणारी अनेक हॉटेल शोधून काढत त्यांच्यावर कारवाई केली होती. भीमाच्या मोबाईलमध्ये त्यावेळी महिलांचे अश्लील फोटो सापडले होते. हेच फोटो तो ग्राहकांना पाठवत होता अशी माहिती त्याने दिली होती. भीमाने आपण उत्तर प्रदेशातील इतर शहरांमध्येही मुली पुरवल्याचे त्यावेळी कबूल केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here