पुण्यातील दत्तनगर परिसरात किराणा दुकानदारावर गोळीबार

pistol
file photo

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर परिसरात एका किराणा दुकानदारावर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोळीबारात दुकानदार गंभीर जखमी झाला आहे.

विशाल प्रल्हाद पंजाबी (वय 36) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी यांचे दत्तनगरमधील शिवांजली चौकात किराणा दुकान आहे. आज रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी पंजाबी यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबार का झाला आणि कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here