काबूल – अफगाणिस्तानमध्ये एका मशिदमध्ये काही तालिबानी दहशतवादी बॉम्ब बनवत होते. या बॉम्बचा मशिदीतच स्फोट होऊन 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी अफगाणिस्तानच्या दौलताबाद जिल्ह्यातील किल्तान गावात काही तालिबानी एका मशिदीत जमले होते. या मशिदीत हे दहशतवादी भुसुरुंग आणि बॉम्ब बनवत होते. यावेळी मोठा स्फोट झाला आणि त्यात 30 दहशतवाद्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी 24 दहशतवादी हे तालिबानी होते तर इतर 6 दहशवतवादी दुसर्या देशाचे होते.
असे असले तरी तालिबान्यांनी या स्फोटात मृत्यू झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. परंतु अफगाणिस्तान सैन्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या भागात काही दहशतावादी स्फोट आणि गोळीबार करून हा भागात ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. पण मशीदीतच स्फोट झाला आणि 30 दहशतवादी ठार झाल्याचे त्यांनी सांगितले.







