‘व्हॅलेंटाइन डे’ ला प्रेयसीचे प्रेम मिळविण्यासाठी पतीने केला पत्नीचा खून

wife-murder

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा होत असतानाच नागपुरात प्रेयसीचे प्रेम मिळविण्यासाठी पतीने पत्नीचा खून केला. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. दीप्ती अरविंद नागमोती (वय २६) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी पतीचे नाव अरविंद अशोक नागमोती (वय ३०, रा. भीमनगर, ईसासनी) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद नागमोती हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील उदापूर येथील रहिवासी आहे. तो हिंगण्यातील एका खासगी कंपनीत वेल्डर पदावर कार्यरत आहे. त्याचे ५ जानेवारी २०२१ रोजी कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील नातेवाईक असलेल्या दीप्ती नावाच्या युवतीशी लग्न झाले होते. दोन आठवड्यांपूर्वीच दोघेही पती-पत्नी ईसासनीतील भीमनगरात भाडेकरु म्हणून राहायला आले होते.

अरविंदचे लग्नापूर्वीच वस्तीत राहणाऱ्या एका युवतीशी अनैतिक संबंध होते. दोघांचे संबंध अगदी घट्ट असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, युवतीच्या आई-वडिलांनी लग्नास विरोध केल्यामुळे लग्न होऊ शकले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव त्याला दीप्तीशी लग्न करावे लागले. लग्नानंतर अरविंदची घरातील वागणूक व्यवस्थित नव्हती. तो नेहमी कुण्यातरी युवतीशी तासनतास फोनवर बोलत होता. दीप्तीने विचारल्यास मैत्रीण असल्याचे सांगत होता.

शनिवारी रात्री दीप्तीने पतीच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग ऐकली. त्यातून तिला एका युवतीशी अनैतिक संबंध असल्याचे कळले. १३ तारखेला दिप्तीने भाऊ शुभमला कॉल केला आणि पतीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती दिली. १४ फेब्रुवारीला सकाळी शुभम बहिणीला फोन केला असता ती उत्तर देत नव्हती. तर जावई अरविंदसुद्धा फोन उचलत नव्हता. त्यामुळे शुभमला संशय आला. त्याने नातेवाईक आणि अरविंदच्या वडिलांसह नागपूर गाठले. घराला बाहेरून कडी लागलेली होती. दार उघडून आत गेले असतात दिप्तीचा मृतदेह पलंगावर पडलेला दिसला. त्यांनी लगेच पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी अरविंदविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here