भोंदुबाबाने मुलीवर केला बलात्कार, पण आईनेच कोर्टात दिली खोटी साक्ष

मुंबई (प्रतिनिधी) – कुरार पोलीस स्टेशनमध्ये ज्या आईने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. त्याच आई विरोधात कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेही न्यायालयाचे आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घडलेली हकीकत अशी की, कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक महिला आपल्या दोन मुलींसह राहत होती. पतीने सोडल्याने त्यात हलाखीची परिस्थिती असल्याने मिळेल ते काम करुन ही महिला घर चालवत होती. त्यात मोठी मुलगी मानसिकरित्या कमकुवत असल्याने ती बरी व्हावी याकरता या महिलेने आपल्याच घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीकडे उपचार सुरू केले. आपल्याकडे दैवी शक्ती असून आपण तुझ्या मुलीला ठीक करू, असं सांगून हा भोंदूबाबा पूजा अर्चा करण्याच्या बहाणे त्या मुलीवर रोज लैंगिक अत्याचार करायचा. असं काही दिवस सुरू होतं. पण एके दिवशी मुलीने त्या भोंदूबाबाकडे जाण्यास नकार दिला. याबाबत तिच्या आईने तिला कारण विचारले असता मुलीने सर्व प्रकार सांगितला.

मुलीच्या आईला सर्व प्रकार कळाल्याने आता आपली काही खैर नाही, हे लक्षात आल्यावर तो भोंदूबाबा कर्नाटकला पळून गेला. दरम्यान, काही महिने होवूनही आपल्या विरोधात काही तक्रार दाखल करण्यात आली नाही. हे त्या भोंदूबाबाला कळताच तो पुन्हा आला आणि त्याने पुन्हा आपली भोंदूगिरी सुरू करत त्या महिलेला धमकवायला सुरुवात केली. जर त्या महिलेने आणि तिच्या मुलीने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही तर तो तंत्रमंत्राचा वापर करुन तिच्या परिवारासह तिच्या नातेवाईकांना देखील संपवून टाकेल, अशी धमकी त्या भोंदू बाबाने दिली. शेवटी त्या बाबांच्या धमक्यांना कंटाळून त्या आईने पोलीस स्टेशनसह राजकीय नेत्यांच्या उंबरठ्याच्या पायऱ्या झिझवल्या आणि त्या भोंदू बाबाला गजाआड केले.

त्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सर्व वस्तूजन्य, वैद्यकीय आणि तांत्रिक पुराव्यावर आधारीत कुरार पोलिसांनी न्यायालयात खटला सुरू केला. पण खटला सुरू होताच तक्रारादार आईने आपली साक्ष फिरवली. माझी मुलगी घाबरली होती तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असं सांगून तिने केलेल्या तक्रारी विरोधातच साक्ष दिली. हे सगळं ऐकून पोलिसांना आणि न्यायालयाला देखील आश्चर्याचा धक्का बसला. पण पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, आरोपी भोंदूबाबाने त्या आईच्या अल्पवयीन मुलीवर पूजा अर्चा करण्याच्या बहाणे लैंगिक अत्याचार केले, हे तपासात स्पष्ट झाल्याने तसंच न्यायालयात देखील हे पोलिसांनी पुराव्या सहित सिद्ध केल्याने आरोपी भोंदू बाळाला न्यायालयाने 12 वर्षांची शिक्षा सुनावली आणि खोटी साक्ष दिली म्हणून तिच्या विरोधात कुरार पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगून आता न्यायालय त्या महिले विरोधात खटला सुरू करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here