औषधे आणण्यासाठी गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

धौलपूर (राजस्थान) – येथील राजाखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका गावातील चार तरुणांनी १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी एकाच गावातील आहेत. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ फेब्रुवारी रोजी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने परिसरातील दुकानात गेली होती. दुकानात मालक आणि अन्य तिघे जण आधीच दबा धरून बसले होते. त्यांनी फूस लावून मुलीला दुकानाच्या आत बोलावून घेतले. त्यानंतर चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके नेमली आहेत. विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here