जुन्नर (सौरभ चौधरी) – जुन्नर तालुक्यामध्ये आज कोरोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल २५ ने वाढली असून आजपर्यंत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल २०९ एवढी झाली आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी हेमंत गरीबे यांनी दिली.
नारायणगाव वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ओझर नवीन गावठाण येथे दोन, हिवरे बुद्रुक येथे तीन, तर येडगाव येथील एक रुग्ण कोरोणा बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. नारायणगाव व वारुळवाडी गावांमध्ये आज एकही कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाला नाही. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी दिली.
दरम्यान पिंपळगाव आर्वी येथे आज आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून उल्लेखनीय बाब म्हणजे जुन्नर तालुक्यातील चार डॉक्टरांना कोरोणा विषाणूची लागण झाली असल्याचे समजते. दिवसेंदिवस जुन्नर तालुक्या वर कोरोना चे सावट गडद होत चालले आहे.







