भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून २ आरोपी पसार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून दोन आरोपीनी फिल्मी स्टाइलने पलायन केले. कोठडीचे लोखंडी गज कापून आरोपी पसार झाले. चंद्रकांत लोखंडे आणि प्रवीण राऊत अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर चोरीचे गुन्हे दाखल होते.

कापूरहोळ येथे पोलिसांच्या गणवेशात येऊन आरोपींनी ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता. त्या गुन्ह्यात राजगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी त्यांना ताब्यात घेतले होते. आता पुन्हा पोलिसांना चकवा देत त्यांनी कोठडीतून पोबारा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here